नागपूर: संपूर्ण शहरातील नागरिकांच्या घराचा / संपत्तीचा अवास्तव कर वाढवून जनतेची लुट करण्याचे छडयंत्र बीजेपी सरकारने रचले आहे. ज्या घराचा कर पूर्वी रु ८०० होता त्या घराला आता १२ हजार कर आकारणी करून हे सरकार कसे जुलमी आहे, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिक संकटात आले आहेत. मनापा कडून केलेली ही करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा नागरिकांना कर भरू नका असे आवाहन करून आंदोलन करण्यात येईल, यासाठी आज आम आदमी पार्टी कडून महापौर नंदाताई जिचकार यांची भेट घेवून सविस्तर चर्चा करण्यात आली. सोबत अनेक नागरिकांचा कर किती जास्त वाढला आहे याच्या डिमांड सोबत आणल्या होत्या. तसेच तुमचे अधिकारी कराबाबत माहिती देतांना व कर घेतांना कसा त्रास देतात, तसेच चेक च्या माध्यमातून रक्कम स्वीकारत नाहीत, त्यामुळे नागरिकांना कसा त्रास होत आहे, याची माहिती दिली.
यावेळी संपूर्ण शहरात मनापा कडून पैश्यांची कशी उधळपट्टी चालू आहे, जसे – नव्याने निर्माण होणारे सिमेंट रोड उखडतात, शाळा सर्व शिक्षण घेण्याच्या लायक नाहीत, कोणत्याही मनपाच्या दवाखान्यात कोणत्याच सुविधा नाहीत, पाणी, बस सेवा, कचरा उचलणे सर्व खाजगीकरण करण्यात आले, मग कर वाढ कशासाठी, या प्रश्नाचे उत्तर मा. महापौर यांच्याकडे नव्हते. यावेळी मा महापौर यांनी कर वाढी मागे घेण्याबाबत उद्यापर्यंत उत्तर देण्याचे आश्वासन दिले. आज आम आदमी पार्टीचे अशोक मिश्रा, डॉ. देवेंद्र वानखडे, गीता कुहीकर, शंकर इंगोले, प्रशांत निलाटकर, डॉ. संजय जीवतोडे, राजेश तिवारी, रायपुरे, निलेश गोयल, दिनेश पांडे, शालिनी अरोरा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.