Published On : Fri, Feb 9th, 2018

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बघितला ‘पॅडमॅन’ मनपा आणि जेसीआयचा उपक्रम

Advertisement

नागपूर : महिला आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक संदेश देणारा अक्षयकुमार यांचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ चित्रपट शुक्रवारी (ता. ९) नागपुरात प्रसारित झाला. हा चित्रपट नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लिबर्टी सिनेमागृहात दाखविण्यात आला.

नागपूर महानरपालिका आणि जेसीआयच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट सुरू होण्यापूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमदार गिरिश व्यास आणि महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिलांच्या व्यथा, सामान्य स्त्रियांच्या व्यथा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडण्यात आलेल्या आहेत. म्हणून हा चित्रपट विद्यार्थिनींना दाखविण्यात येत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सनी फ्रांकोसिस यांनी दिली. मनपाच्या शाळेतील विद्यार्थी सामान्यवर्गातील, गरीब असल्यामुळे स्त्रियांविषयीच्या समस्यांबाबत ते जागृत नसतात. त्यांनी हा सिनेमा बघावा आणि आई-वडिलांनाही हा सिनेमा बघण्यास प्रवृत्त करायला हवे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. यावेळी मनपाच्या शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन वाटण्यात आले.

मनपाच्या सर्व शाळेत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत. पाच रूपयात सॅनिटरी नॅपकीन मनपाच्या शाळेत उपलब्ध करण्यात आले आहे. ८ ते १० शाळांमध्ये मशीन्स लावण्यात आलेले आहे. बाकी सर्व शाळांमध्ये लवकरच लावण्यात येईल, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

यावेळी जेसीआयचे मधू नायडू, प्राची भदे, साक्षी बेदी, नवीन मिश्रा, मनपा शाळेतील शिक्षिका सुषमा फुलारी व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.

मनपातील तीन विद्यार्थी प्रथमच सिनेमागृहात

मनपा आणि जेसीआयने केलेल्या आयोजनाच्या निमित्ताने मनपाचे विद्यार्थी सिनेमागृहात गेले. यापैकी तीन विद्यार्थी प्रथमच सिनेमागृहात आले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना कधीच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याची संधी मिळाली नाही. परंतु, या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे त्यांनी पहिल्यांदा चित्रपटगृहात बसून सिनेमाचा आनंद घेतला.

Advertisement