उस्मानाबाद:- तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे श्री. विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लाहिरी गुरूजी, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, ॲड. अनिल काळे, ॲड. मिलिंद पाटील, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गडेकर, महादेवराव गायकवाड, डॉ. अभय शहापूरकर, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह नरसिंग झरे, रौप्य महोत्सवी वर्ष संचलन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.