Published On : Fri, Feb 23rd, 2018

मनसेचे नेते नितीन नांदगावकरांनी टॅक्सी चालकाला काढायला लावल्या उठाबशा

taxi-nitin_20180260912
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील बेशिस्त टॅक्सी चालकांना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी एका युनिफॉर्म आणि बॅज नसलेल्या चालकाला उठाबशा काढायला लावल्याची घटना आहे.

यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला असून हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ 3.4 लाख लोकांनी पाहिला असून 2,000 हून अधिक लोकांनी शेअर केला आहे. यासंबंधी एएनआयशी बोलताना नितीन नांदगावकर यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर मी युनिफॉर्म आणि बॅज नसलेल्या टॅक्सी चालकाला पाहिले आणि त्याला सांगितले की नियमानुसार टॅक्सी चालव. त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले.

नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवर पेजवर केलेली पोस्ट…
PUBLIC SAFETY IN DANGER. AS THERE ARE ILLEGAL TAXI & AUTO DRIVERS WHO DON’T HAVE REGISTERED BATCHES & UNIFORMS…..
They are getting this freedom as POLICE & RTO police is allowing them for just a petty amount….
If from now onwards any such drivers are caught without UNIFORMS or BATCHES then be ready for the circumstances from my side as a MAHARASHTRA SAINIK.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी बिना परवाना बिना लायसन्स गाड्या चालवून दादागिरी करू नये नाहीतर जागेवर फैसला करेन….
सर्वसामान्य जनतेला जर तुमचा त्रास झाला तर कारवाई तर होणारच…
महाराष्ट्र सैनिक म्हणून कारवाई करणारच…..
कायद्याच्या चौकटीत राहून रिक्षा-टॅक्सी चालवा…
महाराष्ट्र सैनिक…..

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, नितीन नांदगावकर यांनी युनिफॉर्मसह सोबत बॅज नसलेल्या आणि सर्वसामान्यांची लुबाडणूक करणा-या शहरातील टॅक्सी चालकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नितीन नांदगावकर यांनी अशाप्रकारचे अन्य काही व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केले आहेत.

Advertisement