नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कॉन्सिलच्या वतीने ‘सिक्स वेस्ट मॅनेजमेंट रुल्स (२०१६) या विषयावर १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘कॅपॅसिटी बिल्डिंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. निरीचे संचालक डॉ. राकेश कुमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६, बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन नियम २०१६,धोकादायक आणि अन्य कचरा व्यवस्थापन, कंस्ट्रक्शन ॲण्ड डिमोलिशन वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, ई-कचरा व्यवस्थापन नियम २०१६ आदी विषयांचा यात समावेश राहील. समारोपीय सत्रात प्रश्नोत्तरे होतील.
सदर कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.