नागपूर: चकमानकापुर तह सावली येथील आदिवासी शेतकरी साईनाथ मडावी हे दि १७/१०/२०१८ला शेतात धानपिकाची फवारणी करतांना किटकनाशकाच्या विषबाधेने मृत्युमुखी पडले. या प्रकरनाची गंभिरतेने दखल घेवुन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांनी जिल्हाधिकारी यांना दि २३/१०/२०१७ ला निवेदनाद्वारे दहा लाख रुपये साईनाथ मडावी यांचे कुटुंबियाना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली हाेती जिल्हाधिकारी यांनी या प्रकरनाची गंभिरतेने दखल घेवुन आर्थिक मदत तात्काळ देण्यात येईल असे आश्वासन दिले हाेते मात्र सहा महीने हाेत आहेत आदिवासी कुटुंबियाला फुटी कवळी दिली नाही यामुळे आदिवासी साईनाथ मडावी यांचे कुटुंबियावर उपासमारीची पाळी आलेली आहे. साईनाथ मडावी यांचे आई वडील म्हतारे असुन दाेन लहान मुली आहेत यांना सांभाळण्याची जिम्मेदारी पत्नी शालु मडावी हिचेवर आलेली आहे या मुळे या कुटुंबियाव दुखाचे संकट काेसळले असतांना शासन असंवेदनशिलतेचे दर्शन देत आहे यामुळे संतप्त हाेवुन अँड गाेस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरनेआंदाेन सुरु केलेला आहे.
शेतात फवारणी करतांना विषबाधेने मृत्युमुखी पडलेले साईनाथ मडावी यांचे कुटुंबिय वडील माराेती मडावी , पत्नी शालु मडावी, मुली, गायत्री, स्नेहल हे आर्थिक मदत मिळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरने देवुन जिल्हाधिकारी नसल्याने अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांना निवेदन देण्यात आले यावेळी अँड पारेमिता गाेस्वामी यांनी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव प्रविणसिंग परदेशी यांचे साेबत दुरध्वनीवर चर्चा केली असता तात्काळ जिल्ह्यातील सर्व प्रकरण मागवुन घेतले व आर्थिक मदत देण्यात येईल असे अाश्वासन दिले. मृत साईनाथ मडावी यांचे कुटुंबियाना आर्थिक मदत लवकर मिळनार अल्याने आनंद व्यक्त करीत आहेत. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार , महासचिव घनशाम मेश्राम, छाया सिडाम, विशाल नर्मलवार, संगिता गेडाम , श्रिकृष्ण गेडाम, अशाेक दळांजे, मिथुन मडावी, पत्रुजी मडावी, दिवाकर मडावी, अर्चना वेट्टे, रमेश हनमलवार , माेनी कुळमेथे, प्रियंका गावंडे हे आंदाेलनात सहभागी झाले हाेते .