Advertisement
नागपूर: शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दीना निमित्य महावितरणकडून त्यांच्या पुण्य स्मुर्तीला अभिवादन करण्यात आले.
काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या कार्यक्रमास नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, सम्राट वाघमारे, नारायण आमझरे, उमेश शहारे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) पांडुरंग वेळापुरे, वैभव थोरात,सहायक महाव्यस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे उप मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.