Published On : Mon, Mar 26th, 2018

रोहयासह तीन नगरपरिषदांचे रस्ते पथदिव्यांनी उजळणार; आमदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश

Advertisement


मुंबई: केंद्रसरकारमार्फत नव्याने सुरु झालेल्या अंब्रेला योजनेतंर्गत रायगड जिल्हयातील चार नगरपरिषदांच्या रस्त्यावर पथदिवे पेटणार असून हा पहिला मान रायगड जिल्हयाला प्राप्त झाला आहे. दरम्यान आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदांसोबत हा करारनामा करण्यात आला. या महत्वपूर्ण करारनाम्याच्यावेळी आमदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या अंब्रेला योजनेअंतर्गत राज्यात सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील रोहा, श्रीवर्धन, म्हसळा आणि माणगाव या नगरपरिषदांमधील रस्त्यांवर पथदिवे तसेच हायमास्ट बसविण्यासाठीचा करारनामा आज विधानभवनात झाला. या पथदिव्यांसाठी एकुण ५२ लाख रुपये खर्चुन रोहामध्ये २२०, श्रीवर्धन ५३६, म्हसळा ३१८, माणगाव ९९५ एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. या पथदिव्यामुळे वीजबचत होणार असून त्याचा फायदा या चारही नगरपरिषदांना होवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ईईसिएल कंपनीमार्फत या पथदिव्यांचे काम केले जाणार आहे. आणि हे काम एका महिन्यात पूर्णही केले जाणार आहे.


या करारनामावेळी आमदार सुनिल तटकरे, श्रीवर्धन नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे, उपनगराध्यक्ष बाळा सतनाक, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, म्हसळा नगराध्यक्षा कविता बोरकर, उपनगराध्यक्ष नासीर दळवी, माणगाव नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष संदिप खरंगटे, रोहा नगरपरिषदेच्या पर्यटन सभापती स्नेहा आंब्रे, नेहा पिंपळे, महेंद्र गुजर,अहमद दर्जी, यांच्यासह नगरपरिषदांचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, समीर जाधव, अर्चना दिवे,ईईसिएल कंपनीचे अधिकारी कोकाटे,अमित चोपडे उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement