नागपूर: या आठवड्यात दिनांक २९ आणि ३० मार्च २०१८ रोजी महावीर जयंती आणि गुड फ्रायडे निमित्य सार्वजनिक सुट्टी असल्याने शासकीय कार्यालये आणि वित्तीय संस्था बंद राहणार आहेत. थकबाकीदार वीज ग्राहकांची थकबाकीची रक्कम भरताना गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणकडून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महावितरण संचालित उपविभागीय कार्यालयात वीज बिल स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज ग्राहकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
ज्या वीज ग्राहकांना वीज बिल भरणा केंद्रवार जाणे शक्य नाही अश्या वीज ग्राहकांसाठी महावितरणकडून मोबाईल अँप ,ऑन लाईन या महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहक यासाठी डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेट बँकिंग या साधनांचा वापर करू शकतात.
या शिवाय ग्रामीण भागात निवडक ग्राम पंचायतीमध्ये ” आपले सरकार ” किंवा ” महा ऑनलाईन ” या वेब पोर्टलवर जाऊन ग्रामीण भागातील वीज ग्राहक आपल्या वीज देयकाची भरणा करू शकतात. नागपूर अथवा वर्धेत वीज जोडणी आहे पण नोकरी-कामानिमित्य परगावी असणाऱ्या वीज ग्राहकांनी ऑन लाईनच्या माध्यमातून देयकाचा भरणा करावा. अन्यथा थकबाकीदार वीज ग्राहकांना महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कटू कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.