Published On : Sat, Mar 31st, 2018

वाडीत ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्साहात संपन्न


वाडी: पूजा,हवन,कीर्तन,महाप्रसादाचे वितरण, वाडी(अंबाझरी): पवन सुत,अंजली पुत्र,श्री राम भक्त हनुमान यांचे जयंती निमित्ताने वाडी परिसरात विविध ठिकाणी मंदीरात पुजा अर्चना,धार्मिक अधिष्ठान करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भक्तांकडून भव्य महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. समर्थ गजानन सोसायटी स्थित सार्वजनिक हनुमान मंदीर पंचकमेटी तर्फे मंदीरात भक्तांनी सकाळी सुंदर कांड, हवन पुजन केले तर सायंकाळी क्षेत्राचे आमदार समीर मेघे,वाडी न.प.चे नगराध्यक्ष प्रेम झाडे,महिला व बाल कल्याण सभापती सागनबाई पटले, नगरसेविका सरिता यादव,ज्योतिताई भोरकर इ.च्या उपस्थितीत भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी पंचकमेटी चे उद्धव मानकर,शामराव सकलानी,रामप्रसाद पटले, सुनील बनकोटी,अॅड.अरूण तैले,विनोद पटेल, अरूण पगाडे,पाटील साहेब इ.नी अथक परिश्रम घेतले.

नवयुवक हनुमान मंदीर पंचकमेटी वाडी टेकडी तर्फे मंदीरात रात्री जागरण कार्यक्रम संपन्न होऊन घटस्थापना झाली सकाळी पुजा,आरती घेऊन काल्याचे वितरण करण्यात आले.सायंकाळी वाडी न.प.चे उपाध्यक्ष राजेश थोराने,सामाजिक कार्यकर्ते पुरूषोततम रागीट,दुर्योधन ढोणे, लडी महाराज इ.च्या उपस्थित महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.कमिटी चे अध्यक्ष प्रकाश कोकाटे,मधुकर चाफले,गोपाल वरठी, बादल कुंभरे,पप्पु पवार,तुकाराम ढेंगे इ.नी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. श्री.हनुमान मंदीर देवस्थान पंचकमेटी शुभारंभ सोसायटी तर्फे सकाळी सुंदर कांड घेऊन अभिषेक करण्यात आला,दुपारी किर्तन व गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. सायंकाळी कमेटी चे पदाधिकारी वाडी न.प.चे आरोग्य सभापती केशव बांद्रे,संजय टोळे, विलास माडेकर,राजु मस्के,रमेश धुमाळ इ.नी महाप्रसादाचे वितरण केले.सुरक्षा नगर येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात समिती तर्फे आरती,हवन ,पूजन करून दुपारी महाप्रसाद चे वितरण करण्यात आल्याची माहिती प्रवीण लीचडे यांनी दिली.


सार्वजनिक हनुमान मंदीर सब्जी मंडी चौक वाडी येथे मंदीरात सकाळी पुजा,आरती करून दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.नानक मिश्रा,प्रमोद मिश्रा,अश्विन बैस,रोषन सोमकुवर,अभिनव वड्डेवार,निर्मल रेवतानी,गोलु राजपुत इ. नी आयोजन केले.शाहू ले आऊट येथील बांके बिहारी मंदिरात पूजा व आरती संस्थापक हरगोविंद मुरारका यांचे हस्ते व उत्तर भारतीय सभेचे अध्यक्ष प्रवीण सिंग,मानसिंग ठाकूर, वकील विश्वकर्मा,केशव मुरारका,कल्पना विश्वकर्मा,अंकित सिंग,अमित राऊत,हनुमान शर्मा,जी येस तिवारी,राजेंद्र विश्वकर्मा यांच्या उपस्थित महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.वडधामना येथील टेकडी वरील सार्वजनिक हनुमान मंदिरात सकाळपासून भजन,आरती, सुन्दरकांड कथा व महाप्रसादाचे वितरण आयोजक हनुमान जन्मोत्सव समिती ने केल्याची माहिती नरेंद्र मिश्रा,सुनील पांडे यांनी दिली.अमरावती महामार्गावरील हनुमान मंदीरात आरती नंतर महाप्रसादाचे वितरण गणेश हिरणवार, सिताराम हिरणवार,पाठक साहेब, सरला चौधरी,शशि सिरसवार इ.तर्फे करण्यात आले. वाडी पोलीस स्टेशन समोर वाहतूकदार सतिश कौशिक तर्फे शरबत वितरण करण्यात आले. शिवसेना नेते आशिष ईखनकर, माजी उपसभापती रूपेश झाडे, सचिन बोंबले ई.नी हनुमान जयंती निमित्ताने मंदीरात जाऊन महाप्रसादाचे वितरण केले.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement