एप्रिल फूल च्या दिनी नागपुर विद्यापीठ समोरुन निघालेला मोर्चात हजारो च्या संख्येने युवक युवती उपस्थित होते प्रचंड उत्साहात हा मोर्चा व्हेरायटी चौक झाशी रालणी चौक पंचशील चौक मार्गे यशवंत स्टेडियम येथे पोहोचला.
मोर्चाच्या सुरुवातीला नागपुर विद्यापीठा समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली बेरोजगार युवकांचा सरकार विरोधात प्रचंड संताप दिसत होता युवकांना आपल्या भावना लपविता आल्या नाही तेथे पदवीधर युवकांनी गळ्यात टोपले लटकावून पकोड़े व भजे विकले मोर्चाचे आकर्षण ठरले नागपुर लोकसभा युवक कोंग्रेस चा 40×60 फुटाचा तिरंगी झेंडा त्यावर वक्त है बदलाव का हे ब्रीद वाक्य लिहिले होते अखिल भारतीय युवक कोंग्रेस चे राष्ट्रीय सचिव व नागपुर लोकसभा युवक कोंग्रेस चे अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके हे युवकांना मार्गदर्शन करीत होते की आता तरी जागे व्हा मागच्या वेळेस तुम्ही भूलथापाना बळी ठरले.
रोजगारच्या नावाने तुमच्या कडून मते मागितली पण शहरातल्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मी सुद्धा नागपूर च्या युवकांना मिहान मध्ये रोजगार देऊ असे खोटे आश्वासन दिले होते. सरकारच्या धोरना मुळे व तुघलकी निर्णयामुळे युवकांच्या नौकऱ्या जात आहे. भारत हा युवा देश आहे. पण दुर्दैव्याने युवकांना फसविन्यात येत आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची गरज आहे. युवकांचा हा मोर्चा यशवंत स्टेडियम येथे पोहोचला व सभेत रुपांतर झाला.
अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले,सावनेरचे आमदार सुनील केदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व नगरसेवक प्रफुल्ल गुढधे पाटिल, अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव प्रतिभा रघुवंशी, नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुलक, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके,अनीस अहमद, नितिन राउत यांचे भाषण झाले.
युवक काँग्रेसच्या मोर्च्यात रामटेक लोकसभा युवक काँग्रेस व nsui चे कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा लोकशाही पद्धतीने निघाला पण बेरोजगार युवकांचा एल्गार दिसून येत होता. प्रचंड नारे,घोषणाबाजी करीत मोर्चाच्या सभास्थानी समारोप करण्यात आला. मोर्चा यशस्वी होण्याचे कारण गेल्या काही दिवसात नागपुर लोकसभा युवक काँग्रेस ने चौका चौकात 178 ठिकाणी पथनाट्य घेऊन बेरोजगार युवकांन मध्ये जनजागृति केली.
मोर्च्याला लाभलेला प्रचंड प्रतिसाद हा या सरकार विरोधी एल्गार आहे. या मोर्च्यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव जिया पटेल, नरेन जिचकार,नितिन कुम्भलकर, शकूर नागाणी,ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल राय, कुंदा राउत, कुणाल राउत, nsui अध्यक्ष अमीर नूरी, नगरसेवक कमलेश चौधरी, परसराम मानवटकर, दिनेश यादव, आलोक कोंडापुरवार, जावेद शेख, राजेंद्र ठाकरे, सौरभ शेळके, अक्षय घाटोले, स्वप्निल बावनकर,हेमंत कातुरे, फजलुर कुरेशी, नावेद शेख, राज बोकडे, स्वप्निल ढोके, अक्षय हेटे, अंकित गुमगावकर, शुभम ठाकुर, आशीष लोनारकर, पूजक मदने, प्रफुल्ल इजनकर, अतुल मेश्राम, फरदीन खान, मोइज खान, शाहबाज खान, पंकेश निमजे, नितिन सुरुशे, देवेंद्र तुमाने, हर्षल धुर्वे, निखिल वानखेड़े, प्रवीण टुले आदि असंख्य युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.