Advertisement
मुंबई: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या हेतूने चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपूरी वनविभागातील तळोदी आणि चिमूर वनपरिक्षेत्रातील घोडझरी अभयारण्याचे क्षेत्र अधिसूचित करण्यात आले असून यासंबंधीची अधिसूचना दि. २३ मार्च २०१८ रोजी निर्गमित झाली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
घोडझरी अभयारण्यात एकूण १५,३३३.८८ हेक्टर म्हणजेच १५३.३३८८ चौ.कि.मी चे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. अभयारण्याच्या चतु:सीमा या अधिसुचनेद्वारे निश्चित करून दिल्या असल्याचेही वनमंत्र्यांनी सांगितले.