Published On : Fri, Apr 6th, 2018

शेतकरी नेते सत्येकार यांचा प्रयत्नाने नवीन बैल बाजार सोबतच आठवळी बजाराचा ही शुभारंभ

Advertisement


पारशिवनी: जिल्हातील पारशिवनी तहसील मधील पेंच डॅम(धरण)व पेंच नॅशनल पार्क(वन अभ्यारण्य) लगतच्या भागात चारगांव इथे दिनांक 4 एप्रिल ला संजय सत्येकार शेतकरी नेते यांच्या पुढाकाराने बैल बाजार(गुरा-ढोरा चा बाजार)व आठवळी बाजार सुरु करण्यात आले.याचे उदघाटन सत्येकार यांच्या हस्ते पार पडले.या भागात बहुतांश शेती कोरडवाहू आहे यात कापूस व तुर हे मुख्य पिक या भागातील आदिवासी व इतर लोक हे पिक घेतात. बहुतांश शेतकरी ट्रक्टर शिवायच बैल जोड़ी ने शेती करतात.

शेतकऱ्यांना शेती कामा साठी लागणारे बैल घेणे किंवा विकण्या साठी दूर मध्यप्रदेश , सावनेर खापा, रामटेक, नागपुर जावे लागते पैसे व वेळ तर जातेच पण गायी म्हसी बैल ने-आन करण्यात मध्ये जनावराचे खुप हाल सुद्ध्य होतात तसेच या भागामधुन लोकांना आठवळी साप्ताहिक बाजारा साठी पारशिवनी इथे जावे यावे लागते याचे अतंर जवळपास 30 ते 80 किलोमीटर इतके पडते ज्याचा अर्थ जितके पैसे आठवळी बाजारात भाजी पाला खरीदी करायला लागते तितकेच पैसे किंवा त्या पेक्षा जास्त पैसे जाण्या-येण्या साठी खर्च करावे लागते.

आता या नवीन बाजारा मुळे शेतकरी आदिवासी तसेच गरीब जनते ला याचा भरपूर लाभ होणार आहे तसेच या बाजारा मुळे स्थानिक लोकांना व्यावसायची संधी मिळेल व रोजगार निर्माण होईल.हा बाजार प्रत्येक शुक्रवार ला चारगांव इथे भरत राहणार आहे. बाजाराच्या उदघाटन प्रशंगी संजय सत्येकार शेतकरी नेते, भगवान गदरे सरपंच चारगांव, शेषराव दुनेदार, सुरेश बगमारे, संजय इनवाते, गुरुदेव सूर्यवंशी, प्रवीण सरपाते, आकाश उमाळे, सागर उमप, राजू दुनेदार, रमेश सहारे, बबन ढोंगे, तुलशिराम दुनेदार, कवळू गदरे, पृथ्वी बागड़े, शेखर राऊत, शोभाराम कुंभारे, अच्छेलाल नैताम, इत्यादि उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above



Advertisement