कन्हान: केसीसी बिल्डकाँन कंम्पनी व्दारे टेकाडी ते आटोमेटीव्ह चौक नागपूर चे चारपदरी सिंमेट रस्ता निर्माण कामात निष्काळजी पणामुळे मोठय़ा प्रमाणात अपघात, वृक्ष तोड, धुळीच्या प्रदुषणाने तसेच सुरक्षाचे निर्देशकांचा अभाव, पाणी नियमित मारत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका होत असून निदोष लोकांना अंपगत्व व जिव हानी होत असल्याने आंबेडकर चौक येथे कन्हान उत्थान संघर्ष समिती व्दारे केसीसी बिल्डकॉन कंपनी विरूध्द मूक प्रदर्शन करून विरोध करण्यात आला आणि २३ एप्रिल पर्यंत रस्ता निर्माण कामात सुधारणा न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी मुख्य संयोजक संजय सत्येकार, संयोजक आशिष पाटील, निशांत मोटघरे, नरेश चिमणकर, संगीत भारती , विष्णु आगाशे , मोहम्मद शेख, स्वप्निल वाघधरे, प्रमोद निमजे, आशिष संगत, सुमे़ध वाघधरे, प्रकाश रामटेके , मुकेश टेभुर्णे प्रामुख्याने उपस्थितीत होते.