Published On : Mon, Apr 16th, 2018

सीएमआरएस ने केले मेट्रोचे परीक्षण

Advertisement

CMRS Inspection

नागपूर: सीएमआरएस (द कमिश्नर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी) ने सोमवारी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे दूसरे आणि अंतिम परीक्षण केले. सीएमआरएस तर्फे मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त व इंडियन रेलवे सर्विस ऑफ़ इंजिनियरीग चे वरिष्ठ अधिकारी. अरविंद कुमार जैन आणि साऊथ सर्कल, बैंगलोर येथील डेप्युटी सीआरएस ई. श्रीनिवासन यांचे नागपूरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम एयरपोर्ट(साउथ) स्टेशनला भेट दिली. याठिकाणी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष, ऑक्सिलरी स्टेशन रूम आणि इतर सबंधित सेवेंची पाहणी केली.

महा-मेट्रो प्रवाश्यांसाठी लवकरच प्रवासी रन (जॉय राईड) ची सेवा सुरु करणार आहे. जमिनी स्थरावर खापरी ते न्यू-एयरपोर्ट दरम्यान सुमारे ५.५ किलोमीटरचा हा प्रवास राहणार आहे. आज झालेल्या पाहणी दरम्यान सीएमआरएस ने मेट्रो कोचेस मध्ये वापरण्यात आलेल्या आपातकालीन सेवा (ब्रेक, निर्गमन गेट, सावांदाची उपकरणे), ब्रेक सिस्टम, सुरक्षे संबंधित उपाय आणि इतर बचाव यंत्राची तपासणी, आसन व्यवस्था, डिजीटल सेवेसाठी वापरण्यात आलेले उपकरणे तसेच इतर सर्व सबंधित उपकरणांची संपूर्ण चाचणी केली.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रवासादरम्यान लागणारे खापरी मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट(साउथ) मेट्रो स्टेशन आणि न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन वर प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान मेट्रो स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवर लावण्यात आलेले आटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्स, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, आपातकालीन यंत्रणांचे परीक्षण केले. परिक्षण करत असताना सीएमआरएस अधिकाऱ्यांनी मेट्रो कोचेस, स्टेशन, टेलिकॉम सबंधित बाबींवर विस्तृत चर्चा केली. तीनही मेट्रो स्थानकावर तपासणी केल्यानंतर सीएमआरएसने रोलिंग स्टॉकची तपासणी करण्यासाठी मिहान कार डेपोमध्ये भेट दिली. याठिकाणी सीएमआरएसने गाडी चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची, व इतर सहायक घटकांची बारकाईने परीक्षण केले.

CMRS Inspection

यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) .सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक(रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग, कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, व्ही के अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, प्रायोरिटी सेव्शन के मुख्य प्रकल्प व्यवस्थापक(रिच-१) . एच.पी.त्रिपाठी, सहाय, पाटील आणि अन्य वरिष्ठ यावेळी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement