पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याचा अवघ्या २५ व्या वर्षात सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. मृत विद्यार्थाचे वजन हे तब्बल १५० किलो होते .
तो बाथरूला गेल्यानंतर अचानक मोठ्याने ओरडला. इतर मित्रांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. ऋषीकेश संजय आहेर (२५, रा. पुणे विद्यापीठ, मूळ.नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आहेर हा पुणे विद्यापीठात एमकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो मुलांच्या वसतीगृहात होता. दरम्यान आज सकाळी उठल्यानंतर तो बाथरूमला गेला.
त्यावेळी अचानक मोठ्याने ओरडला. त्याच्या मित्रांनी धाव घेतली. दरवाजा उघडून त्याला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेचा अधिक पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.