Advertisement
नागपूर: रमजानच्या पवित्र महिन्यात वीज पुरवठा नियमित असेल असे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित झाला तर ते भारनियमन समजू नये. वीजेची कमतरता नाही त्यामुळे रमजानच्या काळात कुठेही भारनियमन करण्यात येऊ नये, असे निर्देश ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.