Advertisement
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
श्री. आठवले यांचा हा पुतळा २५ किलो मेणाचा वापर करून शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी बनविला आहे. हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे. यावेळी शिल्पकार श्री. कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे कौतुक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. याप्रसंगी श्री. आठवले यांच्यासह पत्नी श्रीमती सीमा आठवले व मुलगा जीत आठवले आदी उपस्थित होते.