मुंबई: पालघर मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणूकीत काही इव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता. पालघर पाठोपाठ गोंदिया मध्ये ही काही इव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. या सर्व प्रकारावर शिवसेनेचे संजय राऊत यांचे खळबळजनक आणि तितकेच वादग्रस्त विधान समोर आले आहे. निवडणूक आयोग म्हणजे वेश्या असल्याची आक्षेपार्ह टीका राऊत यांनी केली आहे.
पालघर पोटनिवडणुकीच्या वेळी मतदारांना पैसे वाटतांना आमच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले होते, मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. जर देशभरात निवडणूक आयोग अशीच निष्क्रियता दाखवत असेल, तर याचा अर्थ निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या वेश्येसारखी वागत आहे.’ असे खासदार संजय म्हणाले संजय राऊत यांची ही टीका म्हणजे अत्यंत वादग्रस्त असून आता यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येईल हे पाहण्यासारखे राहील.