नागपूर: नोटाबंदीला दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्या नंतर ही जुन्या नोटांचे घबाड हाती लागणे अजूनही थांबलेले नाही आहे. नागपुरात स्वच्छता मोहिमे दरम्यान फुटाळा तलावात चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढल्याने खळबळ उडाली आहे. जुन्या नोटा मिळाल्याची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी या नोटा जप्त केल्या असून या नोटा आता रिझर्व बँकेत जमा करण्यात आले आहे. पावसाळा लागण्याच्या आधी महापालिके तर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्यात येत आहे.
गुरवारी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तलावातील कचरा काढण्यास सुरवात केली. या नंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या पायाला पिशवी लागली त्यानंतर त्याने टी बाहेर काढली व दुसऱ्या कर्मचाऱ्याला दाखविली. त्यांनी पिशवी उघडली असता त्यामध्ये एक हजार रुपयांची दोन बंडले आणि पाचशे रुपयांचे चार बंडले आढळली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या बाबत माहिती देण्यात आली.
महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकारची माहिती अंबाझरी पोलिसांना दिली. या सगळ्या नोटा पिशवीत असल्याने यांना त्या पिशवीचा रंग लागला आहे. नोटाबंदीच्या इतक्या काळानंतर ही जुन्या नोटा मिळण्याचे प्रमाण वारंवार समोर येत असल्याने आणखी किती काळे धन मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.