मुंबई: भारतीय जनात पक्षातून लोकसभा सदस्याचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये परतलेले माजी खासदार नानाभाऊ पटोलेंनी भविष्यवाणी करताना म्हटले कि, येणा-या काळात भाजपाचे दोन तुकडे होतील याची सुरुवात यशवंत सिन्हा यांनी केलेलीच आहे. ते पहिले नेता आहे कि ज्यांनी भाजपाच्याविरुद्ध बंड पुकारले. पटोले एका डिजीटल वृत्त पोर्टलशी बोलत होते. ते म्हणाले कि, भाजपातून अनेक नेता बाहेर पडतील.बस् आपण फक्त पाहत राहा.
नाना म्हणाले, सर्वांना माहित आहे कि लालकृष्ण आडवाणीसारख्या वरिष्ठ भाजपानेत्यासोबत भाजपाने काय केले. महाराष्ट्रातील वरिष्ठ दिवंगत भाजपा नेता गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपाचा व्यवहार चांगला नव्हता. पटोलेंनी आरोप लावताना म्हटले आहे कि, भाजपा बहुजन समाजाच्या नेत्यांना पसंत करत नाही. भाजपात पेशवाईचा हुकुम चालतो.
उल्लेखनीय आहे कि नाना पटोले यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक झाली. जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. 2014 साली नाना पटोले यांनी दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांना 1 लाख 49 हजार 254 मतांनी पराभूत केले होते. पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर भाजपातून राजीनामा दिला होता. त्यांनी पंतप्रधानांवर शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तेव्हा पटोले यांनी म्हटले होते कि जो कुणी शेतक-यांना दु:ख पोहचवेल तो या देशावर राज्य करू शकणार नाही.
पटोले यांनी ईव्हीएमवरसुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते कि ईव्हीएममध्ये घातपात केला जात आहे. ते म्हणाले कि भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीला आणखी मते मिळायला हवे होते. पटोले म्हणाले कि, भंडारा-गोंदियातील निवडणुक परिणाम, भाजपाची धोरणे आणि लहान व मध्यम शेतक-यांच्या संतापाचा परिणाम आहे. ते म्हणाले कि देशात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र मोदी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. मोदींनी शेतक-यांना आश्वासन दिले होते. मात्र ते आता विसरले आहे. ते म्हणाले कि, मोदींनी 2014 साली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे अभिवचन दिले होते. मात्र आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दिले आहे कि सरकार असे करू शकत नाही.