Advertisement
नागपूर : मुंबईत धडकलेल्या मान्सूनने आज सायंकाळी 7.30 पासून उपराधानीतही दमदार सुरुवात झाली. नाले तुडुंब भरून वाहत होते.
तर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. रेनकोटविना बाहेर पडलेल्यांची त्रेधा उडाली.
आज अपेक्षित असलेल्या पावसाने संपूर्ण शहर चिंब झाले तर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपुरकरांना पावसाने सुखद अनुभूती दिली.