नवी दिल्ली: महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे.
सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार, दहशतवादी कारवाया आणि लष्कर व नागरिकांच्यात होणाऱ्या चकमकी यामुळे अशांत जम्मू-काश्मीर आता राजकीयदृष्ट्या अस्थिर झाले आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. नवी दिल्लीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले.