Published On : Tue, Jun 26th, 2018

मनपाद्वारे हिवताप प्रतिरोध बाईक रॅलीचे आयोजन

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे जून २०१८ हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून शासन निर्णायानुसार साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत लक्ष्मीनगर झोनमध्ये बाईक रॅलीचे आयोजन मंगळवारी (ता.२६) ला करण्यात आले. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अग्निशमन समिती सभापती लहूकुमार बेहेते, मीनाक्षी तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, झोनल अधिकारी, रामभाऊ तिडके, उपअभियंता रवींद्र मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी हिवताप व हत्तीरोग या रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सर्व उपपथकांच्या ३०० कर्मचा-यांना किटकजन्य आजाराबाबत प्रतिज्ञा दिली. त्यानंर बाईक रॅलीचा शुभारंभ झाला.

ही रॅली लक्ष्मीनगर झोन कार्यालय, माटे चौक पेट्रोल पंप, अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्रनगर, देवनगर, अजनी, गजानन नगर, डॉक्टर कॉलनी, छत्रपतीनगर, ऑरेंज सिटी चौक, प्रतापनगर चौक, खामला चौक, सोमलवाडा, राजीव नगर, जयप्रकाश नगर, सहकार नगर, पन्नासे ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर, गजानन मंदिर त्रीमूर्तीनगर, एम.आय.जी.कॉलनी, सुर्वेनगर, नेलको सोसायटी, सुभाषनगर या मार्गाने मार्गस्थ झाली.

यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये या रोगाविषयी जनजागृती करण्यात आली. जनजागृतीचे पोस्टर, स्टीकर, हस्तीपत्राचे वाटप करण्यात आले. या बाईक रॅलीचे आयोजन व नियोजन हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

Advertisement
Advertisement