नागपूर : परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांचे ८०० ते ९०० कोटी रुपये विमा कंपनीने दिले नाहीत त्यामुळे विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे.
हजारो शेतकरी उपोषणाला बसले. परभणी जिल्हा त्यामुळे बंद झाला. रास्ता रोको झाला. एवढं आंदोलन होवून सुध्दा सरकारने दखल घेतली नाही आणि एका विमा कंपनीचं घर भरण्याच्या काम केंद्र आणि राज्यसरकारने केले आहे असा आरोपही आमदार विजय भांबळे यांनी केला.
आज आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी मागणी केली की, ज्या शेतकऱ्यांनी शेतीचा ३०० कोटीचा हप्ता भरला त्याअनुषंगाने परभणी जिल्हयातील शेतकऱ्यांना किमान ८०० ते ९०० कोटी रुपये मिळायला पाहिजे ते पैसे विमा कंपनीने दिले नाहीत म्हणून सरकारकडे मागणी आहे शिवाय शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला त्या अनुषंगाने सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी आम्ही केली आहे असेही आमदार विजय भांबळे यांनी सांगितले.