Published On : Sat, Jul 14th, 2018

दीड लाख कर्ज झाले माफ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता बहुमान

सातारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने माऊलींच्या पालखी सोहळ्यात “संवादवारी” सुरु आहे. आज तरडगाव येथे संवादवारीच्या कलापथकाचा कार्यक्रम पाहणारे वारकरी रावसाहेब सांगळे यांनी या शासनाने आपल्या कर्जमुक्ती देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपला सन्मान केला. तो आपण आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

रावसाहेब आसाराम सांगळे मु. अकोला ता. बदनापूर जि. जालना… मी गेली दहावर्षे वारी करतो, शेतकरी आहे, या वर्षीची वारी अधिक आनंदाची आहे. शासनाने माझे दीड लाख कर्ज माफ केले आहे.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शासनाने सुरु केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेतून माझ्या शेतात शेततळेही मिळाले आहे.

मागच्या दिवाळीत मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मला कर्जमाफीचे प्रमाणपत्र देवून जो माझा सपत्नीक बहुमान केला,तो मी कधीही विसरणार नाही.मुंबईच्या सत्कारावरुन परत येण्या अगोदरच कर्जमाफीचे पैसे माझ्या खात्यात जमा झाले होते.

शेततळे आणि कर्जमाफी मुळे आता मी अतिशय उत्तम शेती करतो आहे. शेततळे , जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना आमच्या मध्ये नवी हिम्मत देत असल्याची भावना रावसाहेब सांगळे यांनी बोलून दाखविली.

Advertisement