Published On : Thu, Jul 19th, 2018

राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच निधन; सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा

Advertisement

सावंतवाडी : बडोद्याच्या राजकन्या तथा सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. राजमाता सत्वशीलादेवी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर घरी आणल्यानंतर त्यांचे निधन झाले.

मूळच्या बडोदा संस्थानच्या सत्वशिलादेवी यांचा विवाह सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे यांच्याशी विवाह झाला होता. शिवरामराजे भोसले आणि राजमात सत्वशीलादेवी यांनी १९६० च्या दशकात कलेच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्याचे काम केले. सत्वशीलादेवी यांनी स्वत: लाकडी खेळणी बनवण्याची कला आत्मसात केली होती. या कलेच्या माध्यमातून तबके पेले, निरंजन, पूजापाट, उदबत्ती, स्टँडची कमळे, ताम्हने, देव्हारे, दौत आणि कमलदाने, गृहोपयोगी वस्तू तयार होत असत. सावंतवाडीची ओळख अनेक कलावस्तूंचे माहेरघर अशी बनली होती. या कलेला राजाश्रय, तसेच लोकाश्रयामुळे वैभव प्राप्त झाले होते. पुढे रंगीत लाकडी फळे आणि खेळणींना मोठी प्रसिद्धी मिळाली.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१९७१मध्ये ‘सावंतवाडी लॅकर वेअर्स’ या संस्थेच्या माध्यमातून राजमाता सत्वशीलादेवी यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी देशभरातील प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. शिवाय जर्मनी, सिंगापूर अशा देशांमध्येही ही कला पोहोचवली. राजमातांनी स्वत: संशोधनातून या कलाप्रकाराला नवी शैली प्राप्त करून दिली होती.

राज घरण्याची भिस्त शिवरामराजे यांच्यानंतर समर्थपणे हाताळण्याचे काम राजमातांनी केले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने सर्वांनीच दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. राजमातांवर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अ‍ॅड. श्यामराव सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी राजमातांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. तर सावंतवाडी राजघराण्याच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement