Published On : Wed, Aug 1st, 2018

अखेर दीपक मानकर पोलिसांना शरण

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर अखेर माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर यांनी आज सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. उच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसात पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आज सकाळी दीपक मानकर हे लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. समर्थ पोलीस ठाण्याजवळील एका जागेवरुन वादातून ही घटना घडली होती.

Gold Rate
Saturday 25 Jan. 2025
Gold 24 KT 80,700/-
Gold 22 KT 75,100/-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दीपक मानकर यांचे सहकारी असलेले हितेंद्र जगताप यांनी एका भुखंड प्रकरणी मानकरांकडून आपला मानसिक छळ होत असल्याची सुसाईड नोट लिहून २ जून २०१८ रोजी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला़ त्यानंतर मानकर मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेथे ३ खंडपीठाने त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

तेथेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने १० दिवसांच्या आत पोलिसांसमारे हजर राहण्याचा आदेश दिला होता.

Advertisement