नवी दिल्ली : प्रेक्षकांना सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय नेण्याला परवानगी देणाऱ्या जम्मू -काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
सिद्धार्थ आनंद यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना रोहितोन नरिमन आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने विचारले की सिनेमागृहात खाद्यपदार्थ- पेय नेण्यावर बंदी टाकण्याबाबत काही संवैधानिक तरतूद आहे का?
या प्रकरणावर पुढील सुनावणी ६ आठवड्यांनी होणार आहे.
गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने म्हटले होते की सिनेमागृहाचे मालक प्रेक्षकांना सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय त्यांच्या परिसरातूनच विकत घेण्याची जबरदस्ती करू शकत नाही किंवा त्यांना मॉल – मल्टिप्लेक्स सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय नेण्यापासून रोखू शकत नाही.
न्यायालयाने पुढे असेही म्हटले होते की मॉल – मल्टिप्लेक्सची ही बंदी प्रेक्षकांच्या खाद्य पदार्थ निवडण्याच्या आणि खाण्याच्या अधिकारावर बंदी आणणे आहे, हे कलम २१ च्या अधिकारात येते.
मल्टिप्लेक्स असोसिएशनतर्फे युक्तिवाद करतांना एड. मुकुल रोहतगी म्हणाले की प्रेक्षकांना सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय नेण्याला परवानगी देणाचा उच्च न्यायालयाचा आदेश चूक आहे. हा आदेश कायम ठ्वला तर या खाजगी संस्था मोडकळीस येतील. मी विस्की घेऊन ताज हॉटेलमधे गेलो आणि तिथे सोडा विकत घेतला तर चालेले का?
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मल्टिप्लेक्स मधे खाद्यपदार्थ आणि पेय महाग विकले जातात म्हणून प्रेक्षकांना सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय नेण्याला बंदी नसावी, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एका जनहित याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने शहर प्रशासनाला, प्रेक्षकांना सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पेय नेण्याची परवानगी देण्याबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यास सांगितले आहे.