नागपूर : नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुंबईच्या मंत्रालयात बदली करण्यात आली. कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तेच विभागीय आयुक्तांचा अतिरिक्त कारभार सुद्धा सांभाळतील. तसेच नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर.एच. ठाकरे यांची नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाचे प्रधान सचिव के.व्ही. कुरुंदकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची बदली करण्यात आली आहे. यासोबतच आभा शुक्ला यांची मार्केटिंग अॅण्ड टेक्सटाईल विभागाचे कोआॅपरेशनचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हधिकारी एस.पी. कल्याणकर यांची मंत्रालयात कामगार विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान संचालक म्हणून बदली झाली. मुख्यमंत्र्यांचे सहसचिव राजेश नार्वेकर यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. तसेच नाशिकचे आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक अमन मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी म्हणून बदली करण्यात आली आहे.