Advertisement
नागपूर: स्वातंत्र्य दिनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केले. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा झाला.
देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते. यानंतर सीआयएसएफ आणि पोलिसांच्या पथकाने सलामी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले.