Advertisement
परळी (बीड) : परळी वैजनाथच्या मोंढा मार्केटमध्ये पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. एकूण 4 दुकानांत ही आग पसरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शॉर्टसर्किटमुळे दुकानांना आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.