Published On : Tue, Aug 21st, 2018

आज गडकरींची​ विविध विषयांवर बैठक

Advertisement

Nitin Gadkari

नागपूर: शहरातील विविध विषयांवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मंगळवार, २१ ऑगस्ट रोजी धरमपेठेतील वनामती सभागृहात दुपारी १२ वाजता बैठक घेणार आहेत. यात प्रामुख्याने डीपी रोड, ऑरेंज सिटी स्ट्रिट यासह एकूण १० विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

बैठकीत विशेषत: डीपी रोडची स्थिती, केळीबाग, जयस्तंभ चौक, तीननल चौक, तेलंगखेडी डीपी रोडचा समावेश आहे. यासोबतच शहरातील मटण, मच्छी मार्केटकरिता जागा निश्चिती करणे, बुधवार बाजार (महाल), सोमवारी पेठ, नेताजी मार्केट, कमाल चौक या बाजारांच्या विषयावरही चर्चा करण्यात येणार आहे. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचा आढावाही घेतला जाणार आहे.

Gold Rate
Monday 17 March 2025
Gold 24 KT 88,000 /-
Gold 22 KT 81,800 /-
Silver / Kg 100,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कचरा व्यवस्थापनासाठी महिला बचतगटांना काम देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात येणार आहे. शहरातील खेळांचे मैदान, पिण्याच्या पाण्याची सद्य:स्थिती, अमृत योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ग्रीन जीम साहित्य उपलब्ध करणे, वाठोडा येथील स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या कामाची प्रग्ती, शहरातून जाणाऱ्या केंद्रीय महामार्गाची ​स्थिती तसेच लंडन सिटी स्ट्रिट आदी विषयांवर चर्चा होईल.

बैठकीला मेट्रोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, जिल्हाधिकारी व नासुप्र सभापती अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त, सार्वजनिक बांध्काम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, वनामतीचे संचालक यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, प्रा. अनिल सोले, नागो गाणार, गिरीश व्यास यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, वृक्षारोपण संदर्भात मनोज टावरी, ग्रीन जीम साहित्यबाबत माहितीसाठी ऋषीकेश पाटील आदी उपस्थित राहतील.

Advertisement
Advertisement