Published On : Thu, Sep 13th, 2018

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉनसारख्या ३२७ गोळ्याऔषधांवर बंदी

Advertisement

ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या ३२७ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एबॉट जशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे. तर, सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचं दार ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली. अमेरिका, जापान, फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडसारख्या अनेक देशांमध्ये एफडीसीवर बंदी आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये ही औषधे विकली जात आहे. भारतातील पडुचेरी असे एकमेव राज्या आहे, ज्या राज्याने या औषधावर बंदी घातली आहे.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारत सरकारने ज्या ३२७ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) गोळ्यांबर बंदी घातली आहे त्याचा भारतातील व्यवसाय ३८०० कोटी रूपयांचा आहे. भारताच्या फार्मा सेक्टरच्या तीन टक्के हा व्यवसाय आहे. भारत सरकारच्या या निर्णयचा फटका फायझरच्या ३०८ कोटी रूपयांच्या व्यवसायावर पडणार आहे. तर एबॉटच्या ४८० कोटी,मॅक्सिऑड्स ३६७ कोटी, पॅनडम २१४ कोटी, सुमो ७९ कोटी आणि जिरोडॉला ७२ कोटी रूपयांचा फटका बसणार आहे.

मार्केट रिसर्च फर्म एआयओसीडी फार्मा ट्रॅकच्या नुसार, एफडीसीजवर बंदी घातल्यास देशातील एक लाख रुपयांच्या औषध बाजारात जवळपास दोन टक्के म्हणजेच २००० कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

FDC म्हणजे काय?
कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून तयार केली जातात. त्यामुळे ते औषध घेण्याची मात्रा (डोस) ठरलेली असते. म्हणून अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटले जाते. सध्या तयार करण्यात आलेल्या यादीत पॅरासिटामोल+फ्रेनिलेफ्राइन+कॅफेन+क्लॉरेफेनिरामाइन मॅलिएट+कोडाइन सिरप अशा प्रकरांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश आहे. तर पॅरासिटामोल+प्रॉपिफेनाजोन+कॅफेन हे तीन घटक वापरल्या जाणाऱ्या कॉम्बिनेशन ड्रग्जचाही समावेश आहे.

Advertisement
Advertisement