Published On : Wed, Sep 19th, 2018

महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर: भारत सरकारच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी महावितरणव्दारे भविष्यामध्ये विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास तत्वतः मंजुरी मिळांली आहे.

महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८ तयार करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी (मुंबई-४, ठाणे-६, नवी मुंबई-४, पनवेल-४, पुणे-१०, मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूर-१०) महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असुन एक आठवडयात कार्यादेश देण्यात येणार आहे. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रांत प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला अंदाजे २ लाख ५० हजार रुंपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई वगळंता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करीत असल्याने महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचे योजिले आहे.

विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथे विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहे. या केंद्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनीट ते १ तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना प्रती युनिट ६ रुंपये दर टीओडी तत्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येणार आहे. तसेच रात्री २२.०० ते सकाळी ६.०० या कालावधीमध्ये वीज दरामध्ये १ रुंपया ५० पैसे एवढी सुटही देण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement