नागपूर : आयुष्यात कलात्मकता असली तर एका संस्कृतीला दुसºया संस्कृती सोबत आणि एका प्रांताला अन्य प्रांतासोबत सहजतेने जोडता येईल. मनाचे मनाशी मीलन होणे ही आजची गरज असल्याचे मनोगत एक्सप्रेरीमेंट इन इंटरनॅशनल लिव्हिंग (ईआयएल) चे अध्यक्ष अजय निगम यांनी व्यक्त केले.
सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या माध्यमातून दाभा येथे चालविण्यात येणाºया सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ईआयएलच्या माध्यमातून विश्वशांती दिनाचे औचित्य साधून कार्यकशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंग कमांडर रविंद्र सहदेव होते तर श्रीमती सोनू सहदेव, ईआयएलचे अध्यक्ष अजन निगम, ईआयएलचे संचालक प्रभाकर खेडकर, श्रीमती मंजू निगम, गुरुकुलच्या संचालक डॉ. शर्मिष्ठा गुप्ता उपस्थित होत्या.
व्यसनमुक्तीसाठी गुरुकुलमधील आलेल्या शिबिरार्थींना सोनु सहदेव यांनी पेंटिग्ज, बलून आदींच्या माध्यमातून आयुष्यात किती चुकीची धारणा असते, त्या सुधारून उत्तम माणून बनण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. विंग कमांडर सहदेव यांनी शिबिरार्थ्यांसोबत जमिनीवर बसून मार्गदर्शन केले. जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा मी कोणत्या पदावर आहो हे महत्वाचे ठरत नाही. ही शिस्त आम्हाला सैन्यदलातूनच मिळाली असल्याचे सांगितले. तुम्ही कितीही मोठे असलात तरी समोरच्या व्यक्तींसोबत आदर आणि सन्मानाने वागा म्हणजे तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती म्हणून नावारूपास याल.
डॉ. शर्मिष्ठा गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उर्वशी गायगोले यांनी सुत्रसंचालन केले अतिथींचे स्वागत वेरुंजली कंगाले, सतीश कडू आणि आनंद यादव यांनी केले.