Published On : Mon, Sep 24th, 2018

मेट्रोची गती ताशी ९० किमी वेगापर्यंत वाढण्यासाठी प्रयत्न सुरु

Advertisement

Nagpur Metro Coachs

नागपूर : एयरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरु केल्या आहेत. संशोधन डिझाइन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ- Research Designs & Standards Organization ) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत आहे. ‘आरडीएसओ’च्या उच्चस्तरीय पथकाने ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी तपासणीला सुरवात केली आहे. सध्या ताशी २५ किमी वेगाने धावणारी मेट्रो ताशी ९० किमी वेगाने धावावी याकरता ही चाचणी केली जात आहे.

विविध मानकाअंतर्गत आरडीएसओ चाचणी करत आहे. १२ सदस्य असलेल्या आरडीएसओ पथकात एस एस परवान, उपसंचालक असून यात 6 अभियंते आणि ५ तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. ‘आरडीएसओ’ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले असून यातून मिळणारी माहिती संकलित केली जाते. ऑसिलेशन ट्रायल (Oscillation trials) ९० किमी सोबतच ५० किमी, ६५ किमी आणि ८० किमी ताशी वेगाने देखील केली जात आहेत.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अंतर्गत प्रवाश्यांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशिप इंडेक्स (Ridership index), आपातकालीन ब्रेक व्यवस्था सारख्या मानकांची देखील चाचणी होत आहे. या सर्व मानकाअंतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून केली जाते. गाडीत एकही प्रवासी नसताना किंवा गाडी प्रवाश्यांची पूर्ण भरली असतांना- या देखील मानकांचे परीक्षण ‘आरडीएसओ’ करीत आहेत.

याप्रमाणे मिळालेल्या सर्व माहितीचे संकलन करत एक अहवाल तयार केला जाईल आणि या अहवालाचा सखोल अभ्यास करत पुढील रूपरेषा आखली जाईल. याआधी याच महिन्याच्या १२ तारखेला ‘आरडीएसओ’च्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत ताशी ९० किमी गतीने गाडी चालविण्याकरिता होत आवश्यक असलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्या पथकाने तयारीवर समाधान दर्शविल्यानंतर आता या चाचण्या होत आहेत.

Advertisement