मुंबई: इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी उद्योजकांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविल्याने उद्योजकांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांचा पुरस्कार सोहळा हॉटेल लीला येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे उद्योग धोरण हे उद्योग व्यवसायाला प्रेरणा देणारे असल्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे श्री.देसाई यांनी सांगितले.
श्री. देसाई यांनी महिंद्रा उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरुनानी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया नायर, एल एण्ड टी टेक्नॉलॉजिज सर्व्हिसेसचे प्रभाकर शेट्टी तसेच इतर उद्योजकांना पुरस्कर देऊन गौरविले.
यावेळी इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या मधुलिका गुप्ता, उद्योजक आदी गोदरेज, सुरेश कोटक, शैलेया हरीभक्त, उदय खन्ना आदी उपस्थित होते.