नागपूर : भांडेवाडी ईएसआर पाणी टंकी व हायड्रन्ट येथील १ करोड ६६ लक्ष रू किंमतीच्या सिमेंटीकरण कार्याच्या कामाचे भूमीपूजन पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांचे हस्ते करण्यात आले.
प्रभाग क्र २६ अ चे नगरसेवक व विधी समिती सभापती ॲड धर्मपाल मेश्राम यांचे परिश्रमातुन व पुढाकाराने ह्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. लवकरच हे कार्य पुर्णत्वास येवून केंद्रीय परिवहन, जहाजराणी व जलसंधारण मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने परिवहन सभापती बंटीभाऊ कुकडे, मनीषाताई कोठे, समिता चकोले, शहर संपर्क प्रमुख प्रा. प्रमोद पेंडके, प्रदीप निनावे, जलप्रदाय डेलिगेट वामनराव फिरके, कंत्राटदार केवलरामानी व भाजपा प्रभाग क्र २६ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाग भाजप अध्यक्ष राजेशजी संगेवार उपस्थित होते.
ह्या सिमेंटीकरणाची आवश्यकता लक्षात घेता महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, तत्कालिन स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, तत्कालिन मनपा आयुक्त अश्वीनजी मुद्गल व त्यानंतर आता आलेले आयुक्त विरेंद्र सिंग ह्यांनी कामाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.