कन्हान : – रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनकार शिवशाहीर भगवान गांवडे यांचे संगीतमय किर्तनाने सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आणि नवनिर्वाचित सरपंच आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ ला सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ओबीसी प्रवक्ता मा.सुनिल पाल यांचे मार्गदर्शन व प्रख्यात किर्तनकार, खंजरीवादक, शिवशाहीर मा. भगवान गांवडे यांचा संगीतमय किर्तनाने सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम तसेच नवनिर्वाचित सरपंच आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून कन्हान शहरांचे नावलौकिक करणाऱ्या नामवंत मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर आयोजित प्रबोधनाच्या व सत्कार सोहळ्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी केले आहे . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मार्गदर्शक कैलास बोरकर, पत्ररकार रमेश गोळघाटे, जिल्हाध्यक्ष मनोज गोंडाणे , पत्रकार चेतन मेश्राम, रोहित मानवटकर, सामाजिक कार्यकर्ता महेंद्र वानखेडे , गोपाल गोंडाणे , नरेश चिमणकर सह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.