Published On : Tue, Nov 6th, 2018

दीपावलीच्या पूर्वसंध्येला मनपामध्ये आनंदोत्सव

Advertisement

नागपूर : एरवी तणावाखाली राहणारे महानगरपालिकेतील कर्मचारी व आंदोलन आणि घोषणांनी दुमदुमणारे महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत आज नगरसेवकांचे गीत, शायरींनी न्हाउन निघाली. निमित्त होते नागपूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे. आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने मनपातील अधिकारी व कर्मचा-यांच्यावतीने मंगळवारी (ता. ६) छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधीपक्ष नेता तानाजी वनवे, राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्‍या धुरडे, उपनेते नरेंद्र बोरकर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकुर, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका कांता रारोकर, स्नेहल बिहारे, हर्षला साबळे, अर्चना पाठक, दर्शना धवड, वंदना भगत, मंगला गवरे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, संदीप गवई, जितेंद्र घोडेस्वार, संजय चावरे, अमर बागडे, महेश महाजन, भगवान मेंढे, राजकुमार शाहू, आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त राजेश मोहिते, रंजना लाडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक आयुक्त महोश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महानगरपालिकेमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांना एकत्र आणून त्यांच्याशी हितगूज करणे, त्यांच्यातील कलेच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये दीपावली उत्सव साजरा करणे, हा या स्नेहमिलनामागील उद्देश होता. यावेळी शुभेच्छा देताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिका एक परिवार आहे व आपण सर्व एका परिवारातील आहोत, याची जाणीव या स्तूत्य आयोजनामुळे होत आहे. रवींद्र ठाकरे यांनी आयुक्तांचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी महानगरपालिकेमध्ये सकारात्मक उर्जा पेरण्याचे काम केले. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी व सर्व पदाधिकारी, नगरसेवकांना एकत्र आणून दीपावलीचा आनंद द्विगुणीत झाला, अशा शब्दांमध्ये त्यांनी आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आपल्या शहराप्रती असलेले प्रेम व मनपाची असलेली काळजी यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करण्याचे धैर्य मिळते, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपलब्ध करून दिलेल्या विशेष निधीबाबत महापौर नंदा जिचकार यांनी आभार मानले.

यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधीपक्ष नेता तानाजी वनवे यांनीही आयोजनाबद्दल अभिनंदन करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सत्तापक्ष नेता संदीप जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाबद्दल आयुक्त रवींद्र ठाकरे व सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, महानगरपालिका माझी आहे, ही जाणीव प्रत्येकामध्ये रुजणे महत्वाचे आहे. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

आनंददायी कार्यक्रम मनपामध्ये आवश्यक : दिलीप हाथीबेड

मनपामध्ये असलेल्या कामाच्या ताणामध्ये असे आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन हे प्रोत्साहित करते. नागपूर महानगरपालिकेमध्ये असे आनंददायी कार्यक्रम होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी यावेळी व्‍यक्त केले. आनंदामुळे कामाचा ताण नाहीसा होतो. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेतल्याने तो द्विगुणीत होतो. या दिपोत्सवात सर्वांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणीत होवो, अशा शब्दांमध्ये दिलीप हाथीबेड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बसपा गटनेता मोहम्मद जमाल, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, प्रतोद दिव्‍या धुरडे, हरीयत इब्राहिम टेलर यांनी गीत सादर करून कार्यक्रमामध्ये रंगत भरली. आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रारंभी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांचा व राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले.

महापौर व आयुक्तांकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

शहरातील सर्व नागरिकांना ही दिवाळी आनंदाची व भरभराटीची जावो, अशी शुभेच्छा महापौर नंदा जिचकार व आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिली. सर्वांनी दिवाळीमध्ये पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक दिवाळीचा संकल्प करून सण साजरा करावा, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार व आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.

Advertisement
Advertisement