Published On : Thu, Nov 22nd, 2018

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी

Advertisement

आयआरसीच्या तांत्रिक प्रदर्शनीचा शुभारंभ
स्थापत्य अभियांत्रिकीमधील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानांचे सादरीकरण

नागपूर: भारत विकसनशील देश असल्याने आपल्या आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट ऑफ कंट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली इंडियन रोड काँग्रेसचे 79 वे अधिवेशनाला गुरुवार, 22 नोव्हेंबरपासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या तांत्रिक (टेक्निकल) प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयआरसीचे सेक्रेटरी जनरल निर्मल कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता आणि आयआरसी आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार, स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी आणि अधिक्षक अभियंता सरदेशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, आयआरसीच्या अधिवेशनात तांत्रिक शोधपत्रे आणि नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे. यातून ज्या नियमावली आणि मानके ठरतील, त्याचा फायदा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना होणार आहे. सोबतच सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असून टाकाऊ वस्तू, कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीमधील साहित्यांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी नितीन गडकरी यांनी फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये सुमारे 200 स्टॉल्स लावण्यात आले असून यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सना भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. गडकरी यांनी जवळपास पूर्णच प्रदर्शनी बघितली. प्रदर्शनीमध्ये व्हीएनआयटी, महावितरण, बीएसएनएल यांचेसह अनेक कंपन्यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनीच्या बाहेर अजस्त्र असे उपकरणे ठेवण्यात आली असून रस्ते विकासात क्षेत्रात सुलभता प्राप्त झाली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणामुळे अनेक थर चढून रस्त्याची जाडी वाढते. त्यामुळे घरे रस्त्याच्या थराच्या खाली जातात. हे टाळण्याच्या उद्देशाने रस्त्यावरील डांबराचा वापर करून रस्ते दुरुस्ती करण्याचे तंत्रज्ञानही येथे प्रस्तुत करण्यात आले असून त्या संबंधीच्या मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय जनआक्रोश संस्थेद्वारे रस्ते सुरक्षा संदर्भातील जनजागृती करणारा स्टॉल लावण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू
या प्रदर्शनीमध्ये एमएसआरडीसीद्वारे समृद्धी महामार्गाची आभासी प्रतिकृती उभारली आहे. ही आभासी प्रतिकृती एलएडी स्क्रीनच्या सहाय्याने संगणकीय दृश्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग तयार झाल्यावर कशा प्रकारचे दृश्य दिसतील, भौतालचे वातावरण कसे असेल, अशा प्रकारचे दृश्य येथे साकारण्यात आले आहे. शिवाय त्याबद्दलची तांत्रिक माहितीही येथे प्रदर्शित करण्यात आल्याने, ही प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Advertisement
Advertisement