नागपूर : रस्ते, फूटपाथ(पदपथ) तसेच वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे धार्मिक अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यालयालायच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिले आहे. या आदेशाचे पालन करत नासुप्र सभापती अश्विन मुद्गल आणि अधीक्षक अभियंता(मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय/सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे करण्यात येत आहे.
याअंतर्गत गुरुवारी, २२ नोव्हेंबर २०१८ रोजी उत्तर नागपुरातील मौजा वांजरी येथील १) शीतला माता मंदिर, पांढुरंग नगर २) शंकर भगवान मंदिर, गुलशन नगर ३) हनुमान मंदिर, गुलशन नगर ४) शिव मंदिर, श्री जगनाडे यांच्या घराजवळ ५) शिव मंदिर, धम्मानंद नगर वांजरा लेआऊट ६) दुर्गा माता मंदिर, श्रीमती अल्का हाडके यांच्या घराजवळ या ६ ठिकाणच्या रस्त्यावरील/फुटपाथवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली. यासाठी ‘३ टिप्पर आणि २ जेसीबी’चा वापर करण्यात आला. सकाळी १०.३० ते सायकांळी ६.०० वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.
कारवाई दरम्यान नासुप्रच्या उत्तर विभागातील कार्यकारी अभियंता श्री आर एन मेघराजानी, विभागीय अधिकारी (उत्तर) श्री अनिल एन राठोड, कनिष्ठ अभियंता श्री सुधीर राठोड, स्था. अभि सहाय्यक श्री हेमंत गाखरे, श्री नरेंद्र दराडे, श्री राजेश सोनटक्के व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री मनोहर पाटील तसेच यशोधरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.