Advertisement
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर येथे आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.