वाडी: शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेने तर्फे वाडीत रविवारी हॉटेल राहुल सभागृहात भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंचावर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय दळवी, उपाध्यक्ष अशोक मांगल,शिवसेना नेते दिवाकर पाटने, माजी नगरसेवक बंडु तळवेकर,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला अतिथींनी छत्रपती शिवराय व दिवं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी शिव वाहतुक सेनेचे पदाधिकारी गणेश कान्हारकर, राकेश अग्रवाल,किताबसिंग चौधरी,घनश्याम पटेल,राकेश यादव,राजन सिंह,शास्वत शुक्ला धर्मेंद्र यादव,प्रमाश शुक्ला,यांनी अतिथींचे मोठ्या पुष्पहाराने स्वागत करून तलवार भेट स्वरुपात दिली.
तद्नंतर भाजप ट्रान्सपोर्ट आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष अखिलेश सिंह यांनी आपल्या 500 पेक्षा जास्त सहकारी ट्रान्सपोटर्स सह या मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेत प्रवेश केला.यावेळी बोलताना उदय दळवी म्हणाले की,सीमेवर वाहतुकदारांची अक्षरशः लुट होत आहे, रस्त्यावर सरकारी टोल ऐवजी गुंडा टोल कार्यरत आहे,सरकारी कर्मचारी मनमानी कारभार करित असल्याने वाहतुकदार त्रस्त झालेला आहे.
भाजप सरकार च्या काळात वाहतुकदारांच्या कोणत्याही समस्या सुटल्या नाहीत.वाहतुकदारात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.या मनमानी विरोधात शिवसेना प्रणित वाहतुक सेनेने कंबर कसली असल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात शेकडो वाहतुकदार उपस्थित होते. संचालन सौ. श्वेता शेगावला यांनी तर आभार दिवाकर पाटने यांनी मानले. या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडीत भगदाड/खिंडार पडल्याचे दिसून येते.