Advertisement
मुंबई : शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका केली आहे.त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईलच परंतु आधी शिवसेनेने भाजपसोबतचा संसार नीट कसा चालेल की घटस्फोट होणार याचंही उत्तर जनतेला हवं आहे असेही नवाब मलिक म्हणाले.