Published On : Sat, Jan 12th, 2019

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण

Advertisement

रामटेक:-रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत उच्च प्राथमिक कांद्री शाळेत विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेतील प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. वेध प्रतिष्ठान ,नागपूर व्दारा जि.प.च्या विद्यार्थ्यांकरीता वेध वृक्षसंवर्धनाचा -जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले.

‘वृक्ष माझा सखा व ‘वृक्षसंवर्धनात माझी भूमिका’या विषयावरील आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांच्या मार्गदर्शनात अब्दुल कलाम वाचन कट्टा अंतर्गत निबंधाचे वाचन करण्यांत आले .

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रियंका भिलावे,रोहन लांजेवार,वैष्णवी बकाल, माधवी मुळेवार, शेजल जमखुरे,मोनिका धुर्वे,प्रिया बर्वे व अश्विनी भिलावे यांनी यात सहभाग घेतला. प्राविण्याबद्धल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यांत आले.केंद्रप्रमुख राजकुमार पचारे सह शिक्षिका निलिमा डेकाटे,ज्योती जांभुळकर अशोक चवरे यांची उपस्थिति लाभली.कार्यक्रमाचे संचालन पूजा ताकोद व आभार पुर्वा मोरेशिया विद्यार्थ्यांनी केले.

Advertisement
Advertisement