Advertisement
– रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध
नागपूर : निवडणूक आयोगाने भारतीय पोलिस सेवेचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार यादव यांची रामटेक व वर्धा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय पोलिस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. दिनेश कुमार यादव हे आय.पी.एस. 1998 या बॅचचे अधिकारी आहेत.
रामटेक लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक 3 येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9022223697, 9635005262 असा आहे.