खांबावरील विधृत ताराची सात वेळा ३ लाख ८४ हजाराची चोरी
कन्हान: पिपरी, टेकाडी मौजा येथील शेतातील एका आठवडयात तिनंदा विधृत खांद्यावरील जिवंत अँल्युमिनियम विधृत ताराची अञात चोरांनी रात्री चोरी करून विधृत महावितरण कंपनीचे दोन लाख ३१ हजार रुपयांचे भारी नुकसान करून शेतकऱ्याला सुध्दा मोठा फटका बसविला आहे.
कन्हान पोलीस स्टेशन पासुन पश्चिमे ला २ ते ३ कि.मी. लांब पिपरी गाडेघाट रोड कडील पिपरी, टेकाडी मौजाच्या शेतकऱ्याच्या शेती करिता असलेल्या विधृत लाईन भाऊराव वरफडे यांच्या शेतातील रविवार (दि.१४) च्या रात्री विधृत सिमेंट खंबा तोडुन पाच विधृत खांबाची अल्युमिनिअम जिवंत तारा किंमत ९१४४० रूपयाची अञात चोरां नी चोरून नेली. त्या सामोरील अखाडु ठाकरे यांच्या शेतातील गुरुवार (दि.१८) ला रात्री तीन खांबाची ५० हजार रुपयां ची विधृत तारा अञात चोरांनी चोरून नेली. रविवार (दि .२२) ला रात्री ब्लँक डॉयमंड वेकोलि कर्मचारी सोसायटीचे गँस गोडाऊन च्या मागील गोलवानी यांच्या शेतातील पाच विधृत खांबाची अँल्युमिनियम तारा किंमत ९० हजार रुपयांची चोरून नेली. अश्या प्रकारे एका आठवठयात तिनंदा अञात चोरांनी २,३१,४४० रूपयांचा अँल्युमिनियमची विधृत तार चोरून नेल्याची महावितरण कंपनी कन्हान चे सहाय्यक अभियंता ओमकार यांनी कन्हान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
या अगोदर १) खंडाळा (निलज) शेतातील दि.१७/०४/२०१७ ला सात खांबाची किंमत ९६७८७ रूपयांचे विधृत तार चोरी, २) राणी बगीचा पिपरी येथे दि १५/ ०६/२०१८ ला १लाख ७० हजार रुपयांची, ३) पिंपरी येथील भोस्कर यांच्या शेतातील दि.०९/१०/२०१८ ला पाच खांबाची किंमत ७७२७१ रूपयांची, ४) पिपरी येथील श्रीराम कोरवते यांच्या शेतातील तीन खांबाची किमत ४० हजार रुपयांची विधृत तार अञात चोरांनी चोरून नेल्याची कन्हान पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार दाखल करण्यात आली होती. पिपरी गाडेघाट परिसरात चार वेळा विधृत खांबावरील जिवंत विघृत तार चोरी करणारे चोर पकडण्यात कन्हान पोलीसांना अद्याप यश मिळाले नसल्याने विधृत तार चोरी करण्या-यांचे मनोबल वाढुन चोरांनी विधृत तार चोरीचा धुमाकूळ घातला आहे.या विधृत तार चोरी मुळे विधृत खंडीत होऊन शेती करणारे, भाजीपाला पिकविणा-या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. याच परिसरात यापुर्वी चार वेळा विधृत तारांची चोरी झाली आहे परंतु चोर पकडण्यात येत नसल्याने चोराची दिवसें दिवस हिंमत वाढत असून शेतकऱ्याला व विधृत मंडळाला नुकसान सहन करावे लागते. यास्तव कन्हान पोलीसांनी योग्य कार्यवाही करून चोरांना पकडुन विधृत चोरीवर अंकुश लावण्याची मागणी शेतकरी भाऊराव वरफडे, अखाडु ठाकरे , रामा भोयर, ईश्वर ठाकरे , पवन ईखार, फाये, गुलाब ठाकरे सह परिसरातील शेतकरी हयानी केली आहे.