Published On : Thu, May 2nd, 2019

भूमिगत केबलची कामे जूनपुर्वी पूर्ण करा

अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे निर्देश

नागपूर: पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होउ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करणे व या कालावधीमध्ये कोणतेही खोदकाम करू नये, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिले.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात विविध ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबल भूमिगत टाकण्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (वाहतूक) ए.जे. बोदेले, ए.जी. नागदीवे, राजेश भूतकर, अनिरूद्ध चौगंजकर, एम.आर. कुकरेजा, अविनाश बारहाते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता डी.एस. बिसेन, एल अँड टी चे मनोज गांधी, रिलायन्स जिओचे सौरभ काळे, मनिष थोरात, एमएसईडीसीएल चे उमेश शाबरे, व्ही.ई. हुमने, अविनाश लोखंडे, हरीश टेरकर, उमेश शेंडे, बीएसएनएल च्या माधुरी निमजे, पी.डब्ल्यू. हटवार, अनील कडाव, ओसीडब्ल्यूच्या निलम वर्मा, स्वप्नील बोराटे, वोडाफोनचे उरीनाथ गेडाम, हर्षद ठाकरे, एसएनडीएलचे सचिन आठवले, एल अँड टी चे बी.आर. अडसुळे, डी.व्ही. कोकाडकर, शैलेंद्र बी, अर्पीत अग्रवाल, जी.एस. पांडे आदी उपस्थित होते.

शहरात मनपाच्या परवानगीने विविध ठिकाणी विद्युत, बीएसएनएल, जिओ आदी केबलसह सिवर लाईन, पाण्याच्या लाईन भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम येत्या जूनपुर्वी तातडीने पूर्ण करणे. नवीन व जुन्या सर्व परवानगीधारक विभाग, एजन्सीना ही अट लागू असून जूनच्या कालावधीमध्ये अत्यंत तातडीचे काम असल्यास त्यास विशेष परवानगी देण्यात येईल. अन्यथा मनपातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगतिले.

स्मार्ट सिटीच्या दृष्टीने शहरात कुठेच खोदकाम केलेली माती पडून राहू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. केबल किंवा लाइन टाकल्यानंतर खड्ड्यांमध्ये सीएलएसएम मटेरिअल भरण्याचेही त्यांनी निर्देश दिले. याशिवाय आतापर्यंत करण्यात आलेल्या भूमिगत केबलच्या कामाची पाहणी करून व्यवस्थित स्थितीत न आढळल्यास दुरूस्ती करून घेण्याचेही निर्देश देण्यात आले.

केबल लाईनसाठी खोदकाम करताना सिवरेज, पाण्याची लाईन व बीएसएनएलच्या केबलला बाधा पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेणे. सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिस-या टप्प्याला सुरूवात होत असून त्याआधीच केबल टाकणे सोयीचे ठरेल. रस्ते बांधकामानंतर कोणत्याही केबलसाठी परवानगी दिली जाणार नाही. मनपाच्या दहाही झोनपैकी ज्या झोनमध्ये एमएसईडीसीएल ची परवानगी घेण्यात आली नसेल त्यांनी तातडीने परवानगी घेउन काम पूर्ण करण्याचेही निर्देश अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिले.

Advertisement